Share

Amol Mitkari | “…नाहीतर महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल” ; अमोल मिटकरींचा अब्दुल सत्तारांना इशारा

Published On: 

Amol Mitkari | मुंबई : शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिली आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. दरम्यान अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सत्तार यांना इशारा दिला आहे.

“अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलु शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वापरलेले अप शब्द 24 तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या. नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल.”

काय म्हणाले अब्दुल सत्तार – 

तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत यावर तुम्ही  काय सांगाल? असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असे सत्तार म्हटले.

सत्तार पुढे म्हणाले, “भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

विद्या चव्हाण आक्रमक-

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आक्रमक झाल्या आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या, “अब्दुल सत्तारला म्हणावं भिकारी चारणे, दहा रुपयाची भीक मागतो काय आणि ५० कोटींची मागतो काय तुम्ही भिकाऱ्यांच्या यादीत आहात. फार कौतुक केल्याने तुम्ही मंत्री झाला नाहीत. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे घटनाबाह्य मंत्रिमंडळ आहे. महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं माहित आहे ती अब्दुल सत्तार काय आहेत. अमित शहा आणि मोदींचे पाय चाटून हे मंत्री झाले आहेत. त्यामुळे यांच्या जिभा घसरल्या तर जिभा छाटण्याचे काम आम्हाला करावे लागेल.”

“अब्दुल सत्तार तुम्हाला शरम वाटते का?, कधी महाराष्ट्रातून तु निवडणून येऊन दाखव. आम्ही निवडणून येऊ देणार नाही. नुसते माफीने आता काम चालणार नाही. महिला नेत्यांना शिव्या देण्याचे काम जर अब्दुल सत्तार करत असतील तर या अब्दुल सत्तार महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही. यांनी ताबोडतोब राजीनामा दिला पाहीजे”, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!