Share

शिवसेनेचं बोट धरुन विधानसभेत आलात; सतेज पाटलांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राजेश क्षीरसागर भडकले

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर:- कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला मंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पूर्णविराम दिला आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्वबळावर लढण्याची भूमिका आधी कोणी घेतली, यावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. स्वबळाची भाषा सर्वात आधी राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना मेळाव्यात केल्याचा दावा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. क्षीरसागर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. सतेज पाटील शिवसेना आणि राष्ट्रवादीला टेकओव्हर करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला.

2014 मध्ये सतेज पाटील यांचा पराभव झाला. 2017 मध्ये त्यांची विधानपरिषदेवर नेमणूक झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी बंटी पाटलांना मतदान केलं. 2019 च्या विधानसभेला त्यांनी धोका दिला. जेव्हा लागतं, तेव्हा निश्चितपणे शिवसेनेकडून घेतात. बंटी पाटील विधानसभेची पायरी चढण्याची पहिली वेळ होती, तेव्हा शिवसेनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. शिवसेनेचं बोट धरुन ते विधानसभेत पोहोचले. ते आज विसरले आहेत, अशी खंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!