Share

‘फोन पे’ चे ग्राहक आहात ! मग मिळणार ‘ही’ देखील सुविधा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आजच्या डिजिटल जगामध्ये ऑनलाईन बँकिंग ही संकल्पना अगदी सामान्यातल्या सामान्य ग्राहकापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे व्यवहार करणे सोपे आणि जलद झाले आहेत. कोरोना काळात या ऑनलाईन बँकिंग वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार होऊ लागले. अशा डिजिटल पेमेंटपैकीच एक अॅप्लिकेशन फोनपे यामध्ये आता ग्राहकासाठी एका नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फोनपे या डिजिटल पेमेंट्स कंपनीने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सच्या सहकार्याने आपल्या अॅपमध्ये टर्म लाइफ इन्शुरन्सचे प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात लोकांना टर्म लाइफ इन्शुरन्सचे पर्याय सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे. या कंपनीने वार्षिक कमीत कमी 149 रुपये एवढ्या कमी हप्त्याचेही प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत.

इन्शुरन्सबद्दलच्या जागरूकतेचा अभाव आणि गुंतागुंतीची कागदपत्रे आदींमुळे देशात इन्शुरन्सच्या वापराचं प्रमाण अवघं 2.73 टक्के आहे, असं फोनपेनं म्हटलं आहे. टियर टू सिटीजमध्ये देशातली मोठी लोकसंख्या राहते. या शहरांमध्ये इन्शुरन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर नाही. म्हणूनच ही दरी भरून काढण्यासाठी फोनपे या डिजिटल पेमेंट कंपनीने पुढाकार घेतला आहे.

देशात सध्या 25 कोटीहून ग्राहक फोनपेचा वापर करतात. 18 ते 50 वर्षं वयोगटातल्या आणि वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न असलेल्या फोनपे युझर्सना फोनपेवर अगदी सहजपणे पॉलिसी घेणं शक्य होणार आहे. हेल्थ चेक-अपविना या पॉलिसीधारकांना हप्त्याच्या रकमेनुसार एक लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळू शकेल, अस फोनपे ने म्हटल आहे. दावा आहे. ग्राहकांकडे असलेल्या अन्य इन्शुरन्स प्लॅन्सची वैधता वाढवणंही फोनपे अॅपद्वारे शक्य होणार आहे.

फोनपे ग्राहकांना टर्म लाइफ इन्शुरन्स खरेदी करता येणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींमधील फोनपे अॅपमध्ये ‘माय मनी’ या सेक्शनमधील इन्शुरन्स या विभागाला ग्राहकांनी भेट द्यावी. त्यात टर्म लाइफ इन्शुरन्स हा पर्याय निवडून विमा रक्कम निवडावी. सर्वसाधारण माहिती आणि नॉमिनीचं नाव आदी माहिती भरल्यानंतर ग्राहक फोनपेवरच ही खरेदीप्रक्रिया पूर्ण करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!