नाशिक : नाशिकमधील दोन मातब्बर नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून ते आज सायंकाळी मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत.
अलीकडेच नाशिकमधील माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे झालेले डॅमेज कंट्रोल करण्याची तयारी शिवसेनेने केल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
वसंत गीते आणि सुनील बागुल हे दोघेही मूळ शिवसैनिक आहेत. वसंत गीते हे नाशिक मध्ये शिवसेनेचे पाहिले महापौर होते. मनसे स्थापन झाल्यानंतर वसंत गीते यांनी राज ठाकरे यांना साथ दिली. नंतर ते मनसेचे आमदार देखील झाले. भाजपाची सत्ता आल्यानंतर ते या पक्षात दाखल झाले होते.
वसंत गीते आणि सुनील बागुल या दोन्ही नेत्यांनी काल शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनाप्रवेश होईल. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर हा प्रवेशसोहळा होईल.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी कधीकाळी अत्यंत जवळीक असलेले आणि नाशिकला मनसेचा बालेकिल्ला बनवण्यात सिंहाचा वाटा असणारे वसंत गीते पुन्हा मनसेत यावेत यासाठीदेखील मनसेकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र एकूणच शहरातली राजकीय परिस्थिती पाहता गीते शिवसेनेत जातील हे जवळपास निश्चित झालं आहे.
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदींची अर्थशास्त्रज्ञांसोबत बैठक
- औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे – रामदास आठवले
- ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा रद्द
- ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील अक्षय कुमारचा किलर लुक व्हायरल
- राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी; शिवसेनेच्या माजी खासदाराची घणाघाती टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
