मुंबई : छोटया पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला.’ घरोघरी लोकप्रिय झाली आहे. मालिकेची कहाणी वेगळी आणि प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारी आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत योगिता चव्हाण ही अभिनेत्री आहे. मालिकेत साध्या पोशाखात दिसणारी अंतरा वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच बोल्ड दिसते. अशातच तिचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे.
योगिताने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘शरारा शरारा..’ या गाण्यावर जोरदार ठुमके मारताना दिसत आहे. तिने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्लाझो घातली आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहे. या गाण्यावर ती सुंदर पद्धतीने डान्स मूव्ह्स करत आहे. तिचा हा डान्स तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. दररोज साडीमध्ये बघणाऱ्या अंतराला या मॉर्डन ड्रेसमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, वाट मोकळी करा अंतरा आलीये, विषय संपला अशी कमेंट केली आहे. तसेच चाहत्यांनी या डान्सचे खूप कौतुक केले आहे.
https://www.instagram.com/reel/CVRgROIKFjl/?utm_medium=copy_link
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अनपेक्षितपणे अंतरा आणि मल्हारचे लग्न झाले आहे. त्यामुळे मालिकेत अंतराची असणारी हमसफर म्हणजेच तिची रिक्षा तिच्यापासून दुरावली होती. मात्र नुकतेच अंतराने पुन्हा एकदा रिक्षा चालवण्याच्या निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मेड फॉर इच अदर’ कपल म्हणत हेमंत ढोमे, क्षितीला चाहत्यांची पसंती
- ‘..याचा अर्थ लसींसाठी महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती’, भाजपची टीका
- पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार ; दिवाळी पहाट कार्यक्रमांचेही आयोजन करता येणार
- ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्माला चाहत्याने केली ‘दिल’ की बात…
- १० लाख लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी औरंगाबाद पालिका सव्वा लाख पावलेच दूर!


