Share

१० लाख लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी औरंगाबाद पालिका सव्वा लाख पावलेच दूर!

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरात १० लाख ५५ हजार ६०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे टार्गेट निश्‍चित केले होते. मात्र आतापर्यंत हे टार्गेट पूर्ण होऊ शकलेले नाही. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मनपाला आणखी सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे दुसर्‍या डोससाठी अजून पालिकेला सुमारे ५ लाख लसींचे डोस लागणार आहेत. मात्र सद्यस्थितीत शिवसेनेला मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी म्हणून त्याला आणखी काळ लागण्याची शक्यता आहे.

शासन निर्देशांनुसार १६ जानेवारीपासून औरंगाबाद शहरात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सुरूवातीला आरोग्य सेवेत काम करणारे कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, नंतर ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने सरसकट १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आजवर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. दुसरी लाट सुरू असतांना कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र त्यावेळी लसींचा तुटवडा निर्माण झाला.

त्यामुळे पालिकेने हाती घेतलेल्या जम्बो लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागला. दुसरी लाट ओसरताच कोरोना लस घेणार्‍यांचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी घटली. आता लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात मिशन कवच कुंंडल मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत पालिकेने शहरात २१ खासगी रूग्णालयांच्या ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. त्यामुळे मागील आठवडाभरापासून लसीकरणाला काहीशी गती प्राप्‍त झाली आहे. सोबतच आता पालिकेच्या आरोग्य विभागाने हायकोर्टसह शहरातील प्रमुख चार मॉलच्या ठिकाणी देखील लसीकरण केंद्र सुरू केले आहे. सध्यस्थितीत पालिकेने निश्‍चित केलेल्या १० लाख ५५ हजार ६०० नागरिकांच्या लसीकरणापैकी १९ ऑक्टोबरपर्यंत ९ लाख २१ हजार १७ जणांनी लस घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!