मुंबई : छोटया पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. रेश्मा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे आणि ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तिचे चाहतेदेखील फोटोंवर भरपूर कमेंटस् करत असतात.
अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने हिंदी मालिकेतही काम केले आहे. तिने नांदा सौख्य भरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. ‘केसरी नंदन’ या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ‘लालबागची राणी’ या चित्रपटातही ती झळकली होती. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचे कथानक आणि यातील पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील दीपाने आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांनाच आपलेसे केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे.
https://www.instagram.com/p/CVTBV22KhG6/?utm_medium=copy_link
रेश्माला दीपाच्या भूमिकेत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत असून रेश्मा शिंदेने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोत रेश्मा खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे. या फोटोवर परमसुंदरी…, लय भारी दिसते, सुंदर…, मात्र एका चाहत्याच्या कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चाहत्याने फोटोवर कमेंट केली आहे की, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे माहीत नाही माझी होशील का, असं म्हणत ‘दिल’बात केली आहे. खुप सुंदर, प्रेम फक्त तुझ्यासाठी नादखुळा म्हणततिला प्रपोझच केले आहे. तसेच चाहत्यांकडून भरपूर लाईक्स येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला-धनंजय मुंडे
- ‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’, भाजपचा पलटवार
- ‘हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा’
- समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्याने नवाब मलिकांना धमकीचा फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

