लखनऊ : भाजप सरकारने दलित, मुस्लिम, ब्राह्मणांना सतावले आहे. आता मात्र सरकारला या समुदायांची आठवण येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आजही सपाच्या कामांची नावे बदलून उद्घाटन करू लागल्याची टीका सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. राजधानी लखनऊच्या रस्त्यांवर पाच किमी सायकल चालवून ते जनेश्वर पार्कमध्ये दाखल झाले. यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
पुढील वर्षी राज्यात निवडणूक होणार आहे. त्याआधी ब्राह्मण समुदायाचे मत वळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सायकल यात्रेच्या निमित्त अखिलेश यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकारांशीही संवाद साधला.
उत्तर प्रदेशमधील भाजपविषयी जनतेत एवढी नाराजी आहे की, २०२२ मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला ४०० जागा विजय मिळू शकतो, असा दावा अखिलेश यादव यांनी केला. भाजपबद्दल नागरिकांमध्ये असमाधान असून या पक्षाला सर्व मतदारसंघात उमेदवारही मिळणार नाही. भाजप राज्यातील ब्राह्मण, दलित आणि मुस्लिमांचा अत्याचार आणि छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले, कोरोनाच्या काळात अनेक लोक उपेक्षित राहिले. त्यांनी कुटुंबातील सदस्याला गमावले. ऑक्सिजन, औषधी मिळाली नसल्याने अशा लोकांना प्राण गमवावे लागले. सरकारने ही सुविधा उपलब्ध करून दिली नाही. सपाने उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांत सायकल यात्रा काढली. ही यात्रा ५-१० किमींची असून भाजपच्या जनताविरोधी धोरणांना त्यामधून कडाडून विरोध करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले ; मुख्यमंत्री योगी म्हणतात…
- ‘आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करा’, खा.गौतमची ‘गंभीर’ मागणी
- ‘मोदी सरकारची कोती मनोवृत्ती उघड’; खेलरत्न पुरस्काराच्या नामकरणावर अशोक चव्हाण यांची टीका
- राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले ; मुख्यमंत्री योगी म्हणतात…
- संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच; मनसेचं खुलं आव्हान !


