🕒 1 min read
औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार आपले वैफल्य लपवण्यासाठी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करीत आहे. त्यातूनच मौलाना कलीमुद्दीन सिद्दिकी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. मौलाना सिद्दिकी यांच्यावरील सर्व आरोप रद्द करून त्यांची मुक्तता करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
मौलाना कलिमुद्दीन सिद्दिकी यांच्या अटकेविरोधात एमआयएमसह धर्मगुरूंच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालसमोर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शिष्ठमंडळाच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
दिल्लीतील असदुद्दीन ओवेसी यांच्या सरकारी निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. त्यात केवळ एकाच आरोपीला पीसीआर मिळतो, तर इतरांना न्यायालयीन काेठडी मिळते. उत्तर प्रदेशात राजकीय फायद्यासाठी मुस्लिम धर्मगुरूंवर खोटे गुन्हे दाखल होते. मी शहरातील व्यापाऱ्यांसाठी भूमिका घेतली म्हणून राजकीय आकसापोटी मोठे गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर पोलिस काम करीत आहेत, असा आरोपही खासदारांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात-आ.सतिश चव्हाण
- आता महाविद्यालये देखील सुरु होणार; उदय सामंत यांनी दिली माहिती
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- मी नरेंद्रजींना म्हणालो, आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल; फडणवीसांचे मिश्किल विधान
- मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
