🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी ७२ तासांची प्रचारबंदी भोगावे लागलेले योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.
आदित्यनाथ यांनी ‘जेव्हा मी खासदार होतो तेव्हा सपा-बसपाच्या खासदाराला त्यांच्या पूर्वजांबद्दल विचारले होते तेव्हा त्यांनी आपण बाबर यांचे उत्तराधिकारी असल्याचे म्हटले होते. एका बाजूला असा उमेदवार आहे जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो तर दुसरीकडे विरोधी पक्षाचा असा उमेदवार आहे जो स्वतःला बाबरची औलाद म्हणतो. जी व्यक्ती वंदे मातरम् म्हणत नाही ती व्यक्ती मत मिळवण्याच्या लायकीची नाही’ असं विधान केले होते. त्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाच्या नोटीसीला सामोरे जावे लागत आहे.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या नोटीसीला २४ तासांच्या आत उत्तर द्वावे अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

