मुंबई : माध्यमाशी संवाद साधत असतांना कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच यावेळी हिंदुराष्ट्राच्या बांधणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेत असल्याचेही कांचन यांनी सांगितले. राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कांचन गिरी आणि सुर्याचार्य दोघे मुंबईत दाखल झाले आहेत.
यावेळी कांचन गिरी म्हणाल्या की,’उद्धव ठाकरे यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करत होते. ते हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे हिंदूंसाठी बोलायचे.’
दरम्यान, पुढे बोलत असतांना ‘उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला. त्यासाठी मी नाराज आहे. पालघरमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केले होते’, असा आरोपही यावेळी कांचन गिरी यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

