Share

‘…तरीही त्यांनी माझ्यासाठी बरेच काही केले’; शगुफ्ताने मानले रोहित शेट्टीचे आभार

Published On: 

मुंबई : कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रातील सुद्धा अनेक कलाकरांना आर्थिक फटका बसला आहे. चित्रीकरण बंद असल्याने कित्येक कलाकरांना काम नाही त्यामुळे कलाकारांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. यातच अभिनेत्री शगुफ्ता अली देखील आर्थिक संकटात सापडली आहे. काही दिवसापूर्वीच शगुफ्ता अली  यांना काम नसल्यामुळे आणि आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे आर्थिक अडचणीचा समाना करावा लागत असल्याचे सांगितले होते. शगुफ्ता अली यांची ही अवस्था पाहून दिग्दर्शक रोहित शेट्टी त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्याने काही पैसे अभिनेत्रीच्या खात्यात ट्रान्सफर केले.

या विषयी एका मुलाखतीत शगुफ्ता अली म्हणाल्या की, ‘मी त्यांची खूप आभारी आहे. देव त्यांना नेहमी आनंदी ठेवो. आम्ही कधी भेटलो नाही आणि कधीच एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलं नाही. याशिवाय आम्ही कधीही फोनवर देखील बोललो नाही आणि तरीही त्यांनी माझ्यासाठी बरेच काही केले. सध्या डॉक्टर व्यस्त आहेत, म्हणून मी पुढच्या आठवड्यात त्याच्याबरोबर अपॉईंटमेंट घेऊन पुढे माझे उपचार पुन्हा सुरू होणार आहेत.’

याआधी शगुफ्ता अली यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्या गेली २० वर्षे आजारी आहेत. मात्र त्यावेळी हे अगदी कमी प्रमाणात होतं. त्यामुळे त्यांची तब्येत चांगली होती. मात्र सध्या त्या कॅन्सरच्या थर्ड स्टेजला आहेत. त्यांनी म्हटलं आहे, मी पहिल्यांदा ही गोष्ट मीडियाला सांगत आहे. मी या अवस्थेत आहे, हे माझ्या जवळच्या काही मित्रांव्यतिरिक्त कोणालाच माहिती नाही. त्याना स्तनाचा कॅन्सर झाला आहे आणि त्याची थर्ड स्टेज होती. त्यामुळे त्यांना तात्काळ सर्जरी करावी लागली होती. त्यांना गेल्या ६ वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा त्राससुद्धा सुरु आहे. त्यांनी सध्या खुपचं वाईट काळ सुरु असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर  लगेचच त्यांना रोहित शेट्टीकडून आर्थिक मदत मिळाली.

कलर्स टीव्हीवरील ‘बेपानाह’ मध्ये त्या काम करत होत्या, मात्र गेल्या चार वर्षांपासून त्या शोमधून बाहेर होत्या. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शगुफ्ता गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास १५ चित्रपट आणि २० मालिकांमध्ये काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!