Share

‘रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या’; भरत जाधव यांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणा सक्षम असणं नितांत गरजेचं आहे. आता प्रमुख रुग्णालयांमध्ये देखील बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे.

दरम्यान, रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणंही अवघड होत आहे. अशावेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट्स, हॉल गाळे हे कोरोना रुग्णासांठी द्या, असं आवाहन मराठी अभिनेता भरत जाधव याने केलं आहे.

भरत जाधव यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे कि, ‘सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे. माझ्या सोसायटीमध्ये चार जण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट १ बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटीमधील दोन रिकामे फ्लॅट्स ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्ता, औषधे देत होता.

https://www.instagram.com/p/COAPDnOBa3f/?utm_source=ig_web_copy_link

रिकाम्या फ्लॅट धारकांचा सहा महिन्यांचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले. १५ दिवसांनी सर्वजण बरे झाले. आता तेच फ्लॅट्स इमर्जेंसीसाठी राखून ठेवले आहेत. हा छोटासा माझा प्रयत्न. आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे होऊन आपले कर्तव्य करण्याची. भरत जाधव यांची हि कल्पना नेटकऱ्यांना फार आवडली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून कंमेंट देखील केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!