मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती सरून महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापन केले. तेव्हापासून राज्यामध्ये शिंदे गट आणि शिवसेना असे दोन गट पडले असल्याचं पाहायला मिळतं आहे. या दोन्ही गटाचे पक्षनेते एकमेकांवर सतत आरोप करत असतात. अशातच शिवसेना पक्षाच्या मुखपत्र सामना मधून राज्यातील सरकारवर टीका करण्यात आली आली असल्याचं समजतं आहे.
शिवसेना पक्षाची सरकारवर टीका-
हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुलं फक्त मंत्र्यांसाठी, देव कोरडेच, असं म्हणत सामनामधून शिवसेना पक्षाने शिंदे आणि फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे सर्वधर्मीय संत व श्रद्धेचे पीठ असलेल्या साईबाबांच्या मंदीरात हार, फुले, नारळ यांच्यावर बंदी घालण्यात आली असून, यावरून देखील सरकारवर सामनामधूल हल्ला केला आहे.
फुलांच्याही ज्वाला होतील-
साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय हे खरे, पण घरातील चुलीच विझल्या, पोटातील आगडोंब उसळला तर फुलांच्याही ज्वाला होतील. शिर्डीतील वातावरण सध्यातरी हेच सांगत असल्याचंं सामनामध्ये म्हटलं आहे.
राज्यातील देव कोरडेच-
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डेप्युटींसह ‘अर्जंट’ दिल्लीस जावे व शिर्डीतील हार-फुलांसंदर्भात काय निर्णय घ्यावा यावर निकाल घेऊन यावे. तोपर्यंत साईबाबांनी भक्तांना शांत राहण्याची सुबुद्धी द्यावी. लोक भडकले, फुले पेटली तर संत साईबाबांवर ईडी आणि सीबीआय कारवाईचे आदेश दिले जातील. तेव्हा फुलांनो, कळ्यांनो, संतांनो शांत रहा! देवांनो गप्प बसा. फुले फक्त मंत्र्यांसाठी आहेत. त्यामुळे या नविन हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात देव कोरडेच राहणार आहेत, असं म्हणत शिवसेना पक्षाने सरकारला चांगलंच फटकारलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । शहाजी पाटलांच्या बायकोला आता लोकांनी साडी घेऊन द्यायची का?; पेडणेकरांचा खोचक सवाल
- Kirit Somaiya | भ्रष्टाचाराच्या स्मारकाला आम्ही गध्याने फोडणार – किरीट सोमय्या
- Devendra Fadnavis | अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेटचे सिनेटर जॉन ऑसोफ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
- Udayanraje Bhosale : “…तर माझ्या गाडीपुढे डॉल्बीची गाडी ठेऊन सगळीकडे फिरलो असतो”
- Video : मनसे नेत्याची खुलेआम गुंडागर्दी, आधी महिलेला चापट मारली आणि नंतर…


