Share

Nana Patole | महाराष्ट्रातलं ईडी, भाजपप्रणित सरकार हे इव्हेंटबाज- नाना पटोले

Published On: 

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती सरून महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापन केले. तेव्हापासून महाविकास आघाडीमधील नेते सत्ताधारी पक्षनेत्यांवर खार खाऊन असल्याचं पाहायला मिळतं आहे. या पक्ष नेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली असते. त्याचप्रमाणे काही नेत्यांवर ईडी च्या कारवाई देखील सुरू आहेत. त्यामुळे अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांची टीका-

महाराष्ट्रातलं ईडी, भाजप प्रणित सरकार हे इव्हेंटबाज असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 2014 ते 2019 या काळात त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यातील एका गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्कामानं राहिले. त्याचा प्रचार, प्रसार झाला. ज्याच्या घरी मुख्यमंत्री होते त्यानीच आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे.

कृषिमंत्रीपद शेतीतून आलेल्या माणसाला मिळावं-

तसेच कृषिमंत्रीपद हे शेतीतून आलेल्या माणसाला मिळावं, अशी अपेक्षा असते. कारण त्याचं दुःख त्यांना माहीत असतं, असंही पटोले म्हणाले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक दिवस बळीराजासोबत हा उपक्रम राज्यभर सुरू केला आहे. या उपक्रमावरूनही नाना पटोले सत्तार यांच्यावर घसरले आहेत.

राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे-

आताच्या कृषिमंत्र्यांनी जे इव्हेंट जाहीर केलं. यांचा शेतकऱ्यांशी कधी संबंध राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली. पण, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. अजूनही पंचनामेचं सुरू आहेत. त्यामुळं हे शेतकरीविरोधी सरकार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!