मुंबई : टीव्ही मालिकेतील अभिनेता खुशांक अरोरा याच्या गाडीतून भरदिवसा लॅपटॉप चोरी करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘ये चाहते है’ या मालिकेतून खुशांक अनेकांच्या पसंतीस पडला आहे. या मालिकेत तो कबीर हे पात्र साकारत आहे.
खुशांक लवकरच एका वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी त्यानं जुहू येथील एका रेस्तरॉमध्ये दिग्दर्शकाची भेट घेतली. त्यावेळी रेस्तरॉच्या पार्किग झोनमध्ये त्यानं गाडी पार्क केली होती. परंतु बाहेर आल्यानंतर कोणीतरी या गाडीची काच फोडून त्यामधील वस्तू आणि सोबतच लॅपटॉप देखील चोरी केला असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
https://www.instagram.com/p/CQLpzuAhqZ-/?utm_source=ig_web_copy_link
या प्रकरणी त्याने जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र या लॅपटॉपमध्ये खुशांकचा काही खासगी डेटा आहे. शिवाय याचा बॅकअप देखील त्याच्याकडे नाही. या लॅपटॉपमध्ये खुशांकचा काही खासगी डेटा असल्याने सध्या तो अस्वस्थ आहे.
महत्वाच्या बातम्या
- कबीर बेदींनी मुलाच्या आत्महत्यानंतर व्यक्त केलं दुःख
- ‘जर झेपत नसेल तर राजीनामा द्या’, सुप्रिया सुळेंनी महापौरांना सुनावले
- इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा सर्वपक्षीय नेते का करत आहेत ?
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- गुगलवर ‘हे’ सर्च करत असाल तर होऊ शकते तुमचीही फसवणूक


