🕒 1 min read
मुंबई : गेल्या दिड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय जवळपास बंदच आहे. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु आहे. मात्र यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र सरासरी गुणांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन नाही तर परिक्षेनंतर लागणाऱ्या निकालाची हुरहूर देखील नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
असं असलं तरी पुढील प्रवाशांसाठी दहावीचे गुण महत्वाचे असल्याने गुण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारण जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये दहावीचा निकाल लागत असतो. मात्र, कोरोना काळात शिक्षण पद्धतीला मोठा फटका बसला असून यंदा परीक्षा न घेता अंतर्गत गुण व चाचण्यांच्या आधारावर मूल्यमापन करून निकाल लावला जात आहे. जुलै महिना सुरु झाल्यानंतर देखील निकाल जाहीर झाला नसल्याने पुढील प्रवेशाची चिंता पालकांसह विद्यार्थ्यांना लागली होती.
अखेर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या(SSC) निकालाबाबत घोषणा केली आहे. उद्या दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लावण्यात येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाइटवरून पाहता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल. याखालील रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.
निकाल कसा व कुठे पाहता येईल ?
www.maharashtraeduction.com
१) निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करावं.
२) त्यानंतर वेबसाईटवर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
३) निकाल पाहण्यासाठी सीट नंबर कोणत्याही स्पेस नुसार टाईप करावा. त्याखालील रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.
४) यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
५) निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- जयंत पाटलांनी साधला सुयश जाधवशी संवाद, टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी दिल्या शुभेच्छा
- पंतप्रधान मोदी वाराणसीत दाखल, १५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण करणार
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

