🕒 1 min read
औरंगाबाद : साहित्य हे विकासाचे अंग असल्याने सरकारने संतपीठाचा प्रश्न मार्गी लावला आहे. मराठीला मदत केलीच पाहिजे. मात्र, हे करत असताना मोबाईलच्या जमान्यात वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आयटी तंत्रज्ञानाचा फायदा आपण घेतो. मात्र, साहित्यिकांचे लेखन आमचे खरे गुगल आहे. आमच्या साहित्यिकांचे लिखाण गुगलपेक्षाही मोठे आहे असे मला वाटते अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. मसापच्या ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष कादंबरीकार बाबू बिरादार, राधाबाई बिरादार, मावळते अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, आमदार सतीश चव्हाण, मधुकरराव मुळे, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकरव ठाले, किरण सगर, डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे, स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे आदी उपस्थित होते.
अशोक चव्हाण म्हणाले की, मी साहित्यावर अधिकारवाणीने बोलणार नाही. पण या ठिकाणी साहित्य संमेलन आणि अनुशेषाचा विषय, साहित्य, नाट्य, लिखाणाच्या बाबतीत अनुशेष अजिबात नाही हे ठामपणे सांगतो. हा जिल्हा ५ टक्के असल्याने येथे थोडी सूट आहे. दीड वर्षानंतर चांगली सुरुवात झाली आहे. ठाले पाटील अध्यक्ष होऊन २० वर्षे उत्तम काम करत आहेत. साहित्य संमेलन घेणे अवघड आहे पण आज येथे चांगलं संमेलन होत आहे. साहित्य हे विकासाचे अंग असल्याने सरकारने मदत केलीच पाहिजे. राजाश्रय आवश्यक आहे. आपण चिंता करू नका मदत केली जाईल. आपण प्रमुख असताना सांस्कृतिक धोरणाला आकार दिला होता. त्याला अधिक गती देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत सकारात्मक भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.
संमेलनात अत्यंत चांगले मुद्दे विषय चर्चेसाठी घेतले आहेत. मनपानेदेखील साहित्य परिषदेचे कार्यालय सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. हे काम 6 महिन्यात मार्गी लावले जाईल. मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी समिती स्थापन केली आहे. संतपीठावर 8 वर्षे चर्चा होत आहे. पण मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले आणि संतपीठाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याठिकाणी चांगले काम करणारे लोक असले पाहिजेत. मोबाइलच्या जमान्यात वाचनसंस्कृती वाढली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात-आ.सतिश चव्हाण
- आता महाविद्यालये देखील सुरु होणार; उदय सामंत यांनी दिली माहिती
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- मी नरेंद्रजींना म्हणालो, आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल; फडणवीसांचे मिश्किल विधान
- मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
