Share

‘भविष्यात निम्मी शिवसेना राष्ट्रवादी- काँग्रेस पोखरणार हे माझे शब्द लिहून ठेवा’

Published On: 

🕒 1 min read

पारनेर : राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरबुर सुरूच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वीच पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर बेबनाव झाला असून शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

आजोबा होण्याच्या वयात झाले बाबा, उद्योजकाच्या तिसऱ्या पत्नीने दिला गोंडस मुलाला जन्म

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता आणल्यानंतर हे फोडाफोडीच राजकारण पहिल्यांदाच झाले असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्व उत्सुकतेने पाहत आहेत. हे तीन पक्षाचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं विरोधकांच मत असून, आज बारामती मध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या प्रवेशाने पुन्हा सरकार मध्ये नाराजी निर्माण होऊ शकते.

दरम्यान, या सर्व प्रकारावर रयत क्रांती संघटनेने भाष्य केले आहे. शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेले त्याचा परिणाम काय होतो याची आम्हीच वाट पाहत आहोत कारण दैनिक सामना या पेपरात नेहमी वेगवेगळ्या विषयावर अग्रलेख लिहीत असतात यावर संजय राऊत काय लिहितात हे पाहावे लागेल. आपल्या पक्षाचे अधपतन होत आहे असे लिहणार की अजित पवार यांची ताकत वाढत आहे असे लिहिणार ? असा थेट सवाल रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे उपस्थित केला आहे.

शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे आहेत सत्तेसाठी स्वतःच्या पक्षाचे खच्चीकरण होत आहे. ज्या मुंबईच्या जीवावर पक्ष मोठा झाला आज त्या मुंबईची मोठ्या प्रमाणात हानी होत चालली आहे. एका बाजूला कोरोनाचा थैमान आहे दुसऱ्या बाजूला सर्व उद्योगधंदे बंद आहेत. आता पावसामुळे पूर्ण मुंबई जाम झाली आहे. हिंदमाता, लालबाग, परळ या इतर भागात पाणी साचले यासंबंधी कोणतेही नियोजन नाही .गेली अनेक वर्ष झाले मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे ती पायाभूत सुविधेपासून कोसो दूर आहे ,त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष पदाधिकारी आणि नेत्यांपासून फार लांब गेला आहे त्यामुळे शिवसेनेचे पडझड सुरू झाली आहे. भविष्यात निम्मी शिवसेना राष्ट्रवादी- काँग्रेस पोखरणार आहे. मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकित निम्म्याच्या वर शिवसेना राष्ट्रवादीच्या गळाला लागतील हे माझे शब्द लिहून ठेवा हे होणारच .

‘मुख्यमंत्री म्हणाले दादा तुम्हीच जा अन् थोडीतरी अब्रु वाचवा’, पारनेर प्रकरणावरून भाजपचा टोला

आता महाविकास आघाडी सरकार मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी सर्व मुख्यमंत्र्याचे सर्व निर्णय अजित दादाच घेत असतात. उद्धव ठाकरे यांना नावापुरते मुख्यमंत्री आहेत. त्यात ते व संजय राऊत व आदित्य ठाकरे खुश आहेत पण सामान्य शिवसैनिक प्रचंड नाराज आहे कारण सत्तेत राहून सुद्धा त्यांचे कोणतेच काम होत नाही. फक्त कुचंबना होते. त्यामुळे नवनिर्वाचित शिवसैनिक हे पक्ष सोडून जात आहे येणाऱ्या काळात अनेक शिवसैनिक विशेषता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं भाकीत देखील शिंदे यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!