पारनेर : राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरबुर सुरूच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वीच पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर बेबनाव झाला असून शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.
हे खरंच सरकार नाही ‘सर्कस’ आहे, नितेश राणेंनी डागली ‘ठाकरे सरकार’वर तोफ
दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता आणल्यानंतर हे फोडाफोडीच राजकारण पहिल्यांदाच झाले असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्व उत्सुकतेने पाहत आहेत. हे तीन पक्षाचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं विरोधकांच मत असून, आज बारामती मध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या प्रवेशाने पुन्हा सरकार मध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. तर या कोरोनाच्या महामरी काळात पुन्हा सुरु झालेल्या राजकारणामुळे नक्कीच वेगवेगळे अर्थ उपस्तिथ होत आहेत.
मात्र आता या पक्षप्रवेशाला अजित पवारांचा साफ नकार असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे ते पाच नगरसेवक राष्ट्रवादीत घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नकारच होता. त्यांची पक्षांतराची भूमीका योग्य नसल्याचे पवार यांनी नगरसेवकांना वारंवार सांगितले, परंतु ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. राष्ट्रवादीत घेतले नाही, तर ते भाजपमध्ये जाणार होते. पारनेरमध्ये भाजपची ताकद वाढू नये, याच उद्देशाने त्यांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय झाला, अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात काय बदलले, शिवसेनेचा योगी सरकारवर घणाघात
आता या प्रकरणावरून भाजप नेते अवधूत वाघ यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘आतली बातमी अशी आहे की शिवसेनेचे नगरसेवक शिवसेना नेत्यांचे ऐकायलाच तयार नव्हते. तेव्हा मामुंनीच दादांना आग्रह केला की तुम्ही स्वत: जा व ऑपरेशन यशस्वी करा. थोडीतरी अब्रु वाचेल. एकच वादा…उपमुख्यमंत्री दादा’ असा उपरोधिक टोला अवधूत वाघ यांनी लगावला आहे. आता यावर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.
आतली बातमी अशी आहे की शिवसेनेचे नगरसेवक शिवसेना नेत्यांचे ऐकायलाच तयार नव्हते. तेव्हा मामुंनीच दादांना आग्रह केला की तुम्ही स्वत: जा व आॅपरेशन यशस्वी करा. थोडीतरी अब्रु वाचेल.#पारनेर
एकच वादा
उपमुख्यमंत्री दादाhttps://t.co/ht9CQ3XQIZ— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) July 6, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

