🕒 1 min read
नवी दिल्ली – आजोबा होण्याच्या वयात एक उद्योगपती चक्क बाबा झाले आहेत. स्वित्झर्लंड येथील अब्जाधीश असलेल्या बर्नी एक्सेस्टोन यांना वयाच्या ८९ व्या वर्षी मुलगा झाला आहे. बर्नी एक्सेस्टोन यांची एक वेगळी ओळख सांगायची झाली तर ते फॉर्म्युला वन कार रेसिंगचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत.
या संबंधीत जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, बर्नी एक्लेस्टोन आणि त्यांची पत्नी फॅबियाना फ्लॉसी हिने बुधवारी एका मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ज्या पत्नीपासून त्यांना मुलगा झाला त्या फॅबियाना फ्लॉसी ही त्यांची तिसरी पत्नी आहे. फॅबियाना फ्लॉसी त्यांच्यापेक्षा ४५ वर्षांनी लहान आहे.
त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव एस ठेवले आहे. फॅबियाना आणि बर्नी यांचे २०१२ साली लग्न झाले होते. 2009मध्ये फॅबियाना हिच्याशी ओळख झाल्यानंतर बर्नी यांनी स्लाविका या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला होता.यापूर्वीच्या विवाहातून तीन मुली आणि पाच नातवंडे आहेत.
अब्जाधीश असलेल्या बर्नी यांचा पहिला विवाह इवी बॅमफोर्ड यांच्याशी झाला होता. त्यांना या विवाहापासून डेबोरा नावाची मुलगी आहे. डेबोरा या 65 वर्षांच्या आहेत. त्यांनी स्लाविका रॅडिक हिच्याशी दुसरा विवाह केला होता. या विवाहापासून त्यांना 35वर्षीय तमारा आणि 31 वर्षीय पेट्रा अशा दोन मुली आहेत.
भाजपमध्ये गेल्याचा किंचितही पश्चात्ताप नाही- विखे पाटील
बड्डे बॉयचे कोरोनामुळे निधन, जंगी पार्टीला हजेरी लावणाऱ्या १०० जणांचे धाबे दणाणले
धक्कादायक : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
