Share

जखमा तलवारीनेच होतात असे नाही, कधी कधी पेन ड्राईव्ह सुद्धा…- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभा अध्यक्ष्यांना राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. तद्पश्चात फडणवीसांना पोलिसांनी नोटीस पाठवली. तसेच याप्रकरणी काल(१३ मार्च) मुंबईच्या सायबर पोलिसांनी फडणवीसांचा दोन तास जबाब नोंदवला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘जखमा तलवारीनेच होतात असे नाही,कधी कधी पेन ड्राईव्ह सुद्धा घायाळ करून जातो’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबईच्या सायबर पोलिसांनी फडणवीसांचा दोन तास जबाब नोंदवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीबाबतची माहिती दिली. यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘मी गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले.’ तसेच कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी गप्प बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!