नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. मागील २४ तासात ३७ हजार ७२४ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून कोरोना बाधित रुग्णसंख्या १२ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात सध्या कोरोनाचे ११ लाख ९२ हजार रुग्ण आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) अशी माहिती मिळत आहे की, भारतात २१ जुलैपर्यंत १ कोटी ४७ लाख कोरोना चाचण्यात करण्यात आल्या यामध्ये मंगळवारी करण्यात आलेल्या ३ लाख ४३ हजार २४३ चाचण्यांचाही समावेश आहे. दरम्यान, सध्या भारतात कोरोनाचे ११ लाख ९२ हजार रुग्ण आहेत. यामध्ये ६ लाख ५३ हजार ५० जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलेलं असून ४ लाख ११ हजार १३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोबतच गेल्या २४ तासात ६४८ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २८ हजार ७३२ इतकी झाली आहे.
कोरोना बाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे प्रमुख लक्ष्य असल्याचे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. एकूण नमुना चाचण्यांपैकी कोरोना बाधित नमुन्यांचे प्रमाण म्हणजे कोरोना बाधित होण्याचा दर. देशातील २३ एप्रिल ते २१ जुल या काळातील कोरोना बाधितांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ८.०७ टक्के आहे. मंगळवारी हे प्रमाण ११.१४ टक्के होते. गेल्या आठवडय़ात हे प्रमाण १० टक्के होते. दोन आणि चार आठवडय़ांपूर्वी ते अनुक्रमे ९.७ टक्के व ८ टक्के होते. ३० राज्यांमध्ये कोरोना बाधित होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक – पालकमंत्री शंभूराज देसाई
भारतात कोरोनाच्या हाहाकार, मागील २४ तासांत रेकॉर्डब्रेक रुग्णाची वाढ
कोविड-19 वरील लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

