Share

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक – पालकमंत्री शंभूराज देसाई

Published On: 

वाशिम, दि. १६ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्या अधिक गतीने वाढली आहे. रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक असून याकरिता जिल्ह्यातील शहरी भागांविषयी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाची व जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘जिल्ह्यात जूनपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असून रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील २ शहरांमध्ये पूर्णतः लॉकडाऊन करण्याचा व इतर ४ शहरांमध्ये दुकानांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी या उपाययोजना आवश्यक असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. बाधित रुग्णांमध्ये जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करून विनापरवानगी कोणीही जिल्ह्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी’, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी. त्यांना मास्क, हातमोजे, फेसशिल्ड आदी पुरविण्यात यावे. तसेच कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मास्क न वापरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अथवा आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.

भविष्यात जिल्ह्यात कोरोना विषयक चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळा सुरु करणेसाठी नियोजन करावे, कोविड नियंत्रणासाठी आवश्यक कंत्राटी पदभरतीची प्रक्रिया गतीने करावी. जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य, स्वच्छता, भोजन सुविधा चांगल्या प्रतीच्या पुरविण्यात याव्यात. यासंबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी साताऱ्यात पाहायला मिळाली मोठी गर्दी

कार्यालयं सुरू करण्यापूर्वी निर्जंतुक करणं आणि वैद्यकीय विमाही बंधनकारक

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!