सांगली : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना याची बाधा झाली आहे. आज काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम हे देखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
मोहनराव कदम यांना सांगलीमध्ये कोरोनाच्या संकटात काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.तरमोहनराव कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी यशोदा व त्यांचे पुत्र सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम व नातू दिग्विजय कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच आमदार मोहनराव कदम यांचे पुत्र व भारती हॉस्पिटल, सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व नातू डॉ. जितेश कदम तसेच डॉ. जितेश यांच्या मातोश्री यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी आमदार मोहनराव कदम यांच्यासह कुटुंबातील चौघांचा कोरोनाची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत.
आमदार मोहनराव कदम यांचे वाहनचालक पिंटू मोकळे, शांताराम कदम यांचे स्वीय सहाय्यक विश्वास महाडिक, संपर्कातील इरप्पा कोळी हा कार्यकर्ता असे एकंदरीत सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
‘धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल असा विश्वास होता’
धोनीच्या निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकने बीसीसीआयकडे केली ‘ही’ मोठी मागणी
२०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी; भाजप खासदाराचा धोनीला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

