Share

चिंताजनक : देशात कोरोनाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले; एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाखांच्या पुढे

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. मागील २४ तासांत देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. देशात मागील २४ तासांत ५५ हजार ७९ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या संख्येमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत दहा लाख ५७ हजार ८०६ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. तर पाच लाख ४५ हजार ३१८ जणांवर उपचार सुरु आहेत. चिंताजनक म्हणजे गेल्या २४ तासांत ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकूण कोरोना बळी ३५ हजार ७४७ झाले आहेत.

दरम्यान, देशात सर्वाधिक मृत्यू आणि कोरोना बाधित महाराष्ट्रात जास्त आहे. राज्यात मुंबई आणि पुण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. दिल्लीमध्ये ३९०७, तमिळनाडूमध्ये ३७४१, गुजरातमध्ये २१४७, उत्तर प्रदेशमध्ये १५३०, पश्चिम बंगालमध्ये १४९०, आंध्र प्रदेशमध्ये १,२१३, मध्य प्रदेशमध्ये ८४३ जणांचा कोरोना मुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या. कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. १९ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३ टक्के होता.

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक – पालकमंत्री शंभूराज देसाई

शिवसेनेचा ‘हा’ धडाकेबाज आमदार अडकला कोरोनाच्या विळख्यात,मंत्र्यांसह कार्यकर्त्यांची चिंता वाढली

भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ टक्के – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!