🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्ण संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. असे असूनहि भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
Our recovery rate has gone above 58% and around 3 lakh people have recovered from #COVID19. Our mortality/fatality rate is near 3% which is very less. Our doubling rate has come down to near 19 days, which was 3 days before the lockdown: Union Health Minister Dr Harsh Vardhan https://t.co/IzcrOuyxo8 pic.twitter.com/URziBpE3Zo
— ANI (@ANI) June 27, 2020
देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, जे अत्यल्प आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा १९ दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाउनच्या आधी हे प्रमाण ३ दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
भारतात सध्याच्या घडीला ५ लाख ८ हजार ९५३ करोना रुग्ण आहेत. यापैकी २ लाख ९५ हजार ८८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १ लाख ९७ हजार ३८७ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन देशभरात १५ हजार ६०० वर मृत्यू झाले आहेत.
देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. ही बाब भारतासाठी चांगलीच आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे १० हजार २४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ३ लाखांच्या आसपास रुग्ण देशभरात बरे झाले आहेत अशीही माहितीही हर्षवर्धन यांनी दिली.
दिलासादायक : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले
‘या’ राज्यातील सरकारने 31 जुलैपर्यंत वाढवला ‘लॉकडाउन’
मुंबईत प्रत्येक नागरिक हाच जवान; लष्कराची गरज नाही : मुख्यमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
