Share

चिंताजनक! अजून एक जिल्हा कोरोना हॉटस्पॉट; धुळे जिल्हा देखील रेड झोन मध्ये!

Published On: 

धुळे : कोरोनाने देशभरात २१ हजार चा टप्पा ओलांडला असून राज्यात देखील साडे पाच हजारच्या वर कोरोनाबाधित रुग्ण झालेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील जिल्ह्यांची कोरोनाबाधित रुग्णांनुसार ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन मध्ये विभागणी केली गेली होती.

प्रामुख्याने मुंबई, पुणे हे आधी पासुनच रेड झोन मध्ये होते तर कोल्हापूर, रत्नागिरी, इत्यादी जिल्हे हे ऑरेंज झोन मध्ये होते. तसेच सुरुवातीला नंदुरबार, सोलापूर, धुळे सारखी जिल्हे ज्यात ग्रामीण भाग जास्त येतो ते ग्रीन झोन मध्ये होते. मात्र या आठवड्यात धुळे जिल्हा हा रेड झोन मध्ये गेला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या ८ वरून १५ वर गेल्याने या जिल्ह्याचा आता रेड झोन मध्ये समावेश झाला आहे.

चिंतेची बाब म्हणजे एकट्या धुळे शहरात १२ रुग्ण आढळले आहेत. धुळे जिल्ह्यातील पहिला रुग्ण हा साक्री शहरात १० एप्रिल रोजी सापडला होता. तर २१ एप्रिल पर्यंत धुळे शहरात एकूण सहा, साक्री शहरात १ आणि शिंदखेडा तालुक्यात एक असे ८ रुग्ण पोजीटीव्ह आढळले. तर २१ एप्रिल ला धुळे शहरात आणखी चार तर ब्राह्मणे येथे कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्यात धुळे शहरातील ताशा गल्ली परिसरातील ५७ वर्षीय पॉवरलूम व्यावसायिक व शेतकरी आणि साक्री शहरातील ५३ वर्षीय बांधकाम कारागीर यांचा मृत्यू झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील ७० वर्षीय महिलेवर उपचार सुरु आहेत.असे सामच्या वृत्तानुसार समजते.

दरम्यान, आता जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागांनी देखील कडक सुरक्षितता बाळगुन सतर्क राहणे गरजेचे आहे. आता धुळे शहर देखील कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असल्याचे दिसून येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!