🕒 1 min read
अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी डबल हेडर असेल म्हणजे एका दिवसात दोन सामने खेळले जातील. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) एकमेकांविरोधात भिडतील. सध्याच्या टप्प्यातील दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. चेन्नई आणि कोलकाता यांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत.
सीएसकेने मुंबई इंडियन्सचा (एमआय) 20 धावांनी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) 6 विकेट्सने पराभव केला. त्याच वेळी, केकेआरने आरसीबीला 9 गडी आणि एमआयला 7 गडी राखून पराभूत केले. अशा स्थितीत, जेव्हा धोनीचा कट्टर आणि मॉर्गन ब्रिगेड आमनेसामने असतील, तेव्हा कडवी लढत अपेक्षित आहे. चेन्नईचे 9 सामन्यात 7 विजयानंतर 14 गुण आहेत. CSK शेवटच्या टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरने 9 सामन्यात 4 विजयांसह 8 गुण मिळवले आहेत आणि ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.
आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध चेन्नईच्या संघाचा वरचष्मा आहे. दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत 26 वेळा भिडले आहेत आणि CSK ने 16 सामने जिंकले आहेत. तर केकेआरला 9 सामन्यांमध्ये विजय नोंदवण्यात यश आले. दोन्ही संघांमधील एका सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. शेवटच्या वेळी जेव्हा दोन्ही संघ एकेमकांविरोधात भिडले तेव्हा चेन्नईने कोलकात्यावर 18 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर दोन्ही संघांच्या शेवटच्या पाच सामन्यांमध्ये कोलकाताने चेन्नईसमोर चार सामने गमावले आहेत. केकेआरसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांना शेवटचा विजय चेन्नईविरुद्ध अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर मिळाला. आता या मैदानावर दोन्ही संघांमधील सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे कोलकाता याचा फायदा घेऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच; राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव
- मनिष पांडेनं भर मैदानात केले ‘हे’ कृत्य; सगळीकडे होतेय थू-थू ची चर्चा
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
