अबुधाबी : आयपीएल 2021 मध्ये शनिवारी संध्याकाळी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव करत आयपीएल 2021 च्या प्लेऑफ शर्यतीतून बाद केले.
दरम्यान, या सामन्यात हैदराबादची फिल्डिंग सुरू असताना मनिष पांडेनं मैदानात बालिश वर्तन केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आणि त्याच्या या बालिश वर्तनामुळे त्याच्यावर जोरदार टीका देखील केली जातीये. भुवनेश्वर कुमारनं 20 व्या ओव्हरमध्ये मनिष पांडेनं पंजाबच्या नॅथन एलिसचा कॅच पकडला.
हा कॅच घेतल्यानंतर त्याने आनंदाच्याभरात बॉलचं चुंबन घेतलं. त्यानंतर त्याला लगेच आपली चूक लक्षात आली आणि तो मैदानातच थूंकू लागला. कोविडच्या पार्शवभूमीवर नियमानुसार बॉलला लाळ लावण्याची परवानगी नाही. बॉल चुंबन घेतल्यानंतर कदाचित मनिषला कोरोनाची भीती वाटली आणि त्यानं तातडीनं ही कृती केली.
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच; राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव
- कोल्हापुरात महापुराचा एक थेंबही महामार्गावर येणार नाही; गडकरींचा शब्द
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

