Share

दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच; राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव

Published On: 

अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यातील 36 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली मजबूत फॉर्ममध्ये दिसत होती. या सामन्यात दिल्लीने राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव करत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

राजस्थान समोर दिल्लीने 155 धावांच लक्ष ठेवलं होत. प्रत्युत्तरात राजस्थान 20 षटकांत 6 बाद 121 धावांपर्यतच मजल मारू शकला. नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार सॅमसनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थकी लावला आणि दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

अबुधाबी -ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव करत गुणतालिकेत पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीचा 10 सामन्यातील हा आठवा विजय असून त्यांनी एकूण 16 गुणांसह अंतिम-चारमध्ये निश्‍चित केला आहे.

प्रथम फलंदाजी करायला आलेल्या दिल्लीने श्रेयस अय्यरच्या सर्वाधिक 43 धावा करून 20 षटकांत 6 बाद 154 धावांची मजल मारली. प्रतिउत्तरात राजस्थान संघाने संजू सॅमसनच्या जोरावर 20 षटकांत 6 बाद 121 धावांपर्यतच मजल मारू शकला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 70 धावांची झुंझार खेळी केली. मात्र, मधल्या फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आणि राजस्थान रॉयल्सला पराभवाला सामोरे जावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!