Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप: एक असाही विलक्षण योगायोग

Published On: 

मुंबई : आहमदाबाद येथील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लड संघाचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश मिळवला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना हा इंग्लड येथील साउथहॅम्पटन येथील रोझ बाऊल या मैदानावर १८ ते २२ जुन दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

या सामन्याच्या अनुषंगाने एक अनोखा विलक्षण योगायोग जुळून आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल ही १८ ते २२ जुन दरम्यान होणार आहे. योगायोग म्हणजे सामना सुरु होत असलेली तारीख आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या जर्सीवरील क्रमांक सारखा आहे. सामना १८ जुन रोजी सुरु होईल आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांकही १८ हा आहे.

हा योगायोग इथेच थांबला नाही. तर कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस हा २२ जुन आहे. आणि अंतिम सामन्यातील दुसरा संघ न्युझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन याच्या जर्सीचा क्रमांक हा २२ आहे. म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अतिंम सामन्याची पहिली आणि शेवटची तारीख ही दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या जर्सी नंबर सारखी असल्याचा विलक्षण योगायोग जुळून आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!