Share

ऑस्ट्रेलिया महिला संघाचा विश्‍वविक्रम

Published On: 

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी न्यूझीलंडला ६ विकेट्‌सने मात दिली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 213 धावांचे आव्हान 38.3 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला संघाने सलग 22 व्या एक दिवसीय सामन्यांमध्ये विजयाची नोंद करत नवीन विश्‍वविक्रम प्रस्थापित केला आहे.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेगलेनिंगने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू मेगान शूटच्या चार बळींच्या जोरावर न्यूझीलंडचा डाव २१२ धावांत गुंडाळला.

विद्यमान विश्वचॅम्पियन संघाने सलग २२वा विजय नोंदविताना पॉन्टिंगच्या २००३च्या संघाचा सलग २१ विजय मिळविण्याचा विक्रम मोडला. याआधी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सलग 21 विजय मिळवण्याचा विक्रम 2018 साली केला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका संघाचा एक दिवसीय मालिकेत 3-0 पराभव करत हा विक्रम नोंदवला होता. ऑस्ट्रेलियासह भारताच्या महिला संघाने देखील 2016-17 मध्ये सलग 16 विजय मिळवण्याची कामगिरी केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!