औरंगाबाद : शहराची दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि कमी होत जाणाऱ्या हरितपट्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. हवामान बदलाचा होणारा त्रास कमी करण्यासाठी शहराचा कमी होत जाणारा हरितपट्टा युद्धपातळीवर वाढवणे आवश्यक आहे. हरित औरंगाबाद करण्यासाठी काम करणार्या प्रयास युथ फाउंडेशनच्या माध्यमातून शहराचे हरित क्षेत्र लवकरात लवकर वाढवण्यासाठी मियावाकी पद्धतीने येणार्या पाच वर्षात १०० पेक्षा जास्त मानवनिर्मित जंगल उभारण्याचे नियोजन केले जात आहे. जागतिक वसुंधरा दिनी शहराला पुन्हा निसर्गरम्य बनवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहे.
ऑक्सिजन टॅक्स संकल्पना यासाठी राबविण्यात येत आहे. हे निधी व संसाधन उभे करण्याचे अभियान आहे. यात सर्वांना एका दिवसाला एक रुपया असे एका वर्षांत ३६५ रू. ऑक्सीजन टॅक्स स्वरुपात देणगी प्रयासला देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपण प्रत्येक काम करताना पर्यावरणाची काही ना काही स्वरूपात नुकसान करतो म्हणून आज अशी वेळ आली आहे.
आपण वेळेत जागे झालो नाही तर पर्यावरणाचे असेच नुकसान होत राहील व भविष्यात ऑक्सिजन मिळणेही कठीण होईल. भविष्यात मोफत मिळणारे ऑक्सीजनसाठीसुद्धा पैसे मोजावे लागणार याची जाणीव होणे हा या अभियानाचा भाग आहे. आज कोरोनाने आपल्याला ऑक्सिजनचे महत्व दाखवून दिले आहे. मोफत मिळणारा ऑक्सिजनची आपण कदर करत नाही, याचा नक्की विचार झाला पाहिजे.
मागच्या वर्षी जूनमध्ये या संकल्पनेचा प्रयोग करण्याची सुरुवात झाली आणि यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ऑक्सीजन टॅक्स देण्यासाठीसाठी आवाहन करण्यात आले होते. यात 2 लाख 35 हजार रुपये ऑक्सीजन टॅक्स देणगी स्वरूपात जमा करण्यात आला आहे. काहींनी थेट परदेशात राहुनही औरंगाबादसाठी ऑक्सिजन टॅक्स देऊन आपल्या औरंगाबादला हरित करण्यासाठी योगदान दिले आहे.
आपल्या औरंगाबाद शहराचे हरीत क्षेत्र युद्धपातळीवर वाढवण्याची गरज आहे आणि यासाठी या उपक्रमात आपल्या तन-मन-धन या माध्यमातून मदतीची गरज आहे. आपण सर्व मिळून आपल्या औरंगाबादला हरित औरंगाबाद करूया. असे आवाहन प्रयास युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी चौधरी यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- व्यापाऱ्यांची कुचंबणा! चार तासात आलेले सामान उतरवायचे कि ग्राहकांना द्यायचे?
- ‘अदर पुनावाला डाकू, सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या’; भाजप आमदाराने पाजळली अक्कल
- सायंकाळी विक्री बंद असल्याने लाखो लिटर दूध पडून
- लग्नात दिलेले साहित्य देवाण-घेवाणीच्या कारणावरून मारहाण
- सिग्नलवर उभ्या कारला भरधाव दुसऱ्या कारची धडक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

