Share

व्यापाऱ्यांची कुचंबणा! चार तासात आलेले सामान उतरवायचे कि ग्राहकांना द्यायचे?

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता राज्यभर निर्बंध घातले आहे. त्यातच सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा सामानाला परवानगी दिली आहे. मात्र ग्राहक देखील ९ नंतर येतात याशिवाय चार तासात बाहेरून येणारा किराणा सामान दुकानात उतरावे की, ग्राहकांना सामान द्यावे? असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. याशिवाय दुसरीकडे ११ वाजेनंतर जर दुकाने उघडले तर थेट पावत्या दिल्या जातात. त्यात घरपोच सेवेची परवानगी दिली परंतु दुकानच बंद असेल तर घरपोच सेवा कुठून द्यायची? असा प्रश्न व्यापारी वर्गापुढे उपस्थित झाला आहे.

गर्दी होऊ नये यासाठी आता किराणा दुकानांची वेळ बदलली आहे. त्यात सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा दुकाने खुली करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी घरपोच सेवा देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय बाहेरून सामानाच्या ज्या गाड्या येतात त्यातील सामान उतरवून घेणे, ग्राहकांना सामान देणे त्यात सुरक्षित अंतर कसे ठेवता येईल हे पाहणे यात मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे.

अशी धावपळ होऊ नये यासाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदी विक्रीसाठी द्यावे. त्यानंतर बाहेरून येणारा किराणा सामान उतरविण्यासाठी ११ ते १ हा वेळ द्यावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात होती. असे असले तरी सकाळी ७ ते ११ याच वेळेत सामान उतरविणे असो किंवा ग्राहकांना सामान देणे असो ही कामे करावी लागत आहे. ग्राहकांना सामान द्यावे तर किराणा सामना कधी उतरवावे, आणि सामान उतविण्याची कामे करावी तर ग्राहकांना रांगेत उभे कसे ठेवावे? असा प्रश्न व्यापारी वर्गाला पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!