🕒 1 min read
औरंगाबाद : लॉकडाऊन, त्यानंतर करण्यात आलेले रस्त्याचे काम यामुळे दीड वर्षांपासून गुलमंडीतील रस्ता बंद असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्रस्त व्यापारी वर्गाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरेंनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गुलमंडीतील औषधी भवन जवळील नाल्याचे काम जलदगतीने करा. नागरिकांना व व्यापाऱ्यांना न्याय देण्याची सूचना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रशासनाला दिली.
दलालवाडी भागातील औषधी भवन नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नाल्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून थर्माकोल, औषधींचे बॉक्स, प्लास्टिक बॅगचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. यामुळे नाल्याचा प्रवाह अडवला गेला असून सांडपाणी वाहून जाण्याइतकीही जागा शिल्लक राहिलेली नाही. पुलाचे काम थांबले आहे.
त्यामुळे पैठण गेटचा रस्ता सध्या बंद आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ व रहदारीचा भाग असलेल्या गुलमंडी परिसरात नागरिकांची नेहमी वर्दळ असते. याठिकाणी हा रस्ता बंद असल्याने अनेक अपघात वाढले असून ट्राफिक जॅम होत असल्याने वादविवाद होत असतात. यामुळे प्रशासनाने यांची गंभीर दखल घेण्याची सूचना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संबंधित ठेकेदार, मनपा आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, अजय शाह, शहर अभियंता सखाराम पानझडे आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र पेटवायला मला केवळ दोन मिनिटे लागतील…’- खासदार संभाजीराजे
- ‘ओ सरकार आता बास झालं…’; पुरबाधित शिये गावच्या गावकऱ्यांची पंचगंगेत उडी
- ‘जनआर्शिवाद’ यात्रेसाठी निघालेल्या डॉ. भागवत कराडांना बीड जिल्ह्यामध्ये ‘नो एन्ट्री’?
- ‘या’ कारणासाठी घेतली अभिमन्यू पवारांनी गडकरींची भेट
- महाराष्ट्रात सिने स्टाईल अमली पदार्थांची तस्करी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
