Share

फर्दापूरतांडा येथील कल्पवृक्ष तिर्थक्षेत्रावर बसस्थानकाचे काम सुरु

Published On: 

औरंगाबाद : ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने कल्पवृक्ष कलशाकार दिगंबर जैन तीर्थक्षेत्र फर्दापूरतांडा (ता.सोयगाव) येथे बसस्थानक उभारणीचे काम प्रगतीपथावर असून या बसथांब्याचा कल्पवृक्ष कलशाकार तिर्थक्षेत्रावर येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याची माहिती तीर्थक्षेत्र संचालिका सपना दीदी जैन यांनी दिली असून याबाबत त्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे विशेष आभार मानले आहे.

फर्दापूर-सोयगाव मार्गावरील फर्दापूरतांडा जवळील दिगंबर जैन समाज बांधवांच्या कल्पवृक्ष कलशाकार तिर्थक्षेत्रावर जैनमूनि आचार्य श्री 108 कल्पवृक्षनंदीजी महाराज,बाहुबली सागरजी महाराज यांचे वास्तव्य असल्याने या ठिकाणी नेहमीच जैन बांधवांच्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते त्यासाठी देशभरातील जैन धर्मीय भाविकांचे या तिर्थक्षेत्रावर वर्षभर आवागमन सुरु असते मात्र फर्दापूर-सोयगाव मार्गावर फर्दापूर पासून 3 किमी अंतरावर असलेल्या कल्पवृक्ष कलशाकार तिर्थक्षेत्रावर राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांना थांबा नसल्याने फर्दापूर ते कल्पवृक्ष कलशाकार तिर्थक्षेत्रा पर्यंतचे अंतर गाठतांना जैन भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर कल्पवृक्ष गुरुकुल मंचचे अनिल लुहाडीया,संदीप पाटणी (सिल्लोड) महेंद्र खिवसरा,मनोज छाब्रा (तोंडापूर) आदिनी जंगलातांड्याचे सरपंच मोरसिंग राठोड उपसरपंच हिरा चव्हाण बंजारा समाजाचे नायक तथा तंटामुक्ती अध्यक्ष बाबू ठेकेदार यांच्या माध्यमातून ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कल्पवृक्ष कलशाकार तिर्थक्षेत्रावर येणाऱ्या भाविकांन साठी बसस्थानक उभारण्याची मागणी केली होती दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारा मुळे तिर्थक्षेत्रावर बसस्थानक उभारणीचे काम प्रगतीपथावर असून येथील बसथांब्यामुळे येथे येणाऱ्या जैन भाविकांना दिलासा प्राप्त होणार असल्याने कल्पवृक्ष गुरुकुल मंच व जैन समाज बांधवांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!