🕒 1 min read
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिने महिला विश्वचषक २०२२ च्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार खेळी केली. या स्पर्धेतील भारताचा हा तिसरा सामना असून स्मृतीने शानदार शतक झळकावले आहे. या स्पर्धेत ती जबरदस्त लयीत दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मोठी धावसंख्या गाठण्यासाठी भारताच्या संघाला एका मोठ्या डावाची गरज होती, जी मंधानाच्या बॅटमधून आली.
डावखुरी फलंदाज स्मृतीने (smriti mandhana) १०८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तिचे हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवे शतक आहे. महिला विश्वचषकाच्या इतिहासात स्मृतीने दुसऱ्यांदा फलंदाजी करत शतक झळकावले आहे. यापूर्वी २०१७ च्या विश्वचषकात तिने शतक झळकावले होते. त्याचवेळी, न्यूझीलँडमध्ये सुरु असलेल्या ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ मधील भारताकडून हे पहिले शतक आहे.
स्मृती आता महिला विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. तिने आतापर्यंत तीन सामन्यांत एक शतक आणि अर्धशतकाच्या जोरावर २८१ धावा केल्या आहेत. तिच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाची रॅचेल हेन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात स्मृतीने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२३ धावा केल्या. या डावात तिचा स्ट्राइकरेट १०४.२४ होता. जलद धावा करताना स्मृती बाद झाली. मात्र तिने भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले.
महत्वाच्या बातम्या
- “केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव हा उत्तर प्रदेश निवडणुकीत…”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- मार्नस लबुशेनने शेअर केले जेवणाचे चित्र; चाहते म्हणाले “तु जेल मध्ये आहेस का?”
- “शरद पवारच दादऊचा माणूस आहेत की काय?”, निलेश राणेंचा खोचक सवाल
- “महाराष्ट्राचा अर्थमंत्री अजित पवार होऊ शकत नाही”, निलेश राणेंचे मोठे वक्तव्य
- IND vs SL: बंगळुरू कसोटी सामन्यात अक्षर पटेलला ‘हा’ १३३ वर्ष जुना रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची मोठी संधी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
