मुंबई: महिला टी-20 चॅलेंजचा अंतिम सामना व्हेलॉसिटी आणि सुपरनोव्हा यांच्यात होणार आहे. सुपरनोव्हा आणि व्हेलॉसिटी या दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामन्यात विजय मिळवला आहे, तर १-१ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. व्हेलॉसिटी संघाला ट्रेलब्रेझर्स संघाने हरवले आहे तर सुपरनोव्हास संघाला व्हेलॉसिटी कडून पराभव पत्करावा लागला आहे.
जेव्हा साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा विजय व्हेलॉसिटी संघाने मिळवला होता. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हासने १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीने ७ गडी राखून विजय मिळवला. व्हेलॉसिटीतर्फे शेफाली वर्मा आणि लॉरा वूल्फर्ट यांनी अर्धशतके झळकावली. सुपरनोव्हासकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार खेळी केली होती.
Hello from the Maharashtra Cricket Association Stadium, Pune. ????
It's the Final of the #My11CircleWT20C where the @ImHarmanpreet-led Supernovas square off against Velocity, led by @Deepti_Sharma06. ???? ???? #SNOvVEL
Which team are you rooting for❓ pic.twitter.com/elpj0yBKyF
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
Get ready for final of #My11CircleWT20C pic.twitter.com/n855v6VlbR
— Bleed Blue (@CricCrazyVeena) May 27, 2022
गतविजेत्या ट्रेलब्लेझर्सकडून १६ धावांनी पराभूत होऊनही व्हेलॉसिटीने चांगल्या रनरेटमुळे गुरुवारी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सूपरनोव्हासकडून व्हेलॉसिटी संघाला १९१ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. महाराष्ट्राची अष्टपैलू खेळाडू किरण नवगिरेच्या अर्धशतकामुळे व्हेलॉसिटीने ९ बाद १७४ धावा केल्या. त्यांना अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी चांगल्या रनरेटसाठी किमान १५९ धावांची आवश्यकता होती. त्यामुळे व्हेलॉसिटी संघ या सामन्यानंतर सहज अंतिम फेरीत पोहोचला.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
सुपरनोव्हा – (संभाव्य): प्रिया पुनिया, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, तानिया भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), सून लुस, पूजा वस्त्राकर, अलाना किंग, सोफी एक्लेस्टोन, मेघना सिंग आणि एम वेंकटेशप्पा.
व्हेलॉसिटी – (संभाव्य): शेफाली वर्मा, नट्टाकन चांटम, यास्तिका भाटिया (विकेट कीपर), लॉरा वॉलवर्ड, दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण प्रभू, स्नेह राणा, राधा यादव, माया सोनवणे, अयाबंगा खाका आणि केट क्रॉस.
महत्वाच्या बातम्या:

