Share

“महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांच्या कबरी इथेच खोदल्या जातील” ; शिवसेना खासदारांचा हल्लाबोल

Published On: 

अंबरनाथ : मागील काही काळापासून राज्याच्या राजकारणात सातत्याने शिवसेना आणि भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजप मधील आरोप प्रत्यारोप थांबायचे नाव घेत नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वेगवेगळे आरोप करताना दिसून येत आहेत. नुकतेच शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडी कारवाई सुरु केली आहे. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम केलं जात आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान करणाऱ्यांच्या कबरी उद्या महाराष्ट्रामध्येच खोदल्या जातील, अशा कठोर शब्दात शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी विरोधकांवर तूफान हल्लाबोल केला आहे. अंबरनाथमध्ये पार पडलेल्या शिवसंपर्क अभियाना मेळाव्यात पाटील बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेची कारवाई ही अवैध बांधकाम असेल तरच होत असते. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने काही कामधंदा, उद्योग करायचा नाही का ?उद्योगधंदा करत असताना इन्कम टॅक्सच्या चूका या जाणीवपूर्वक झालेल्या नसतात, परंतु त्या चुका शोधून, त्यांच्यामागे यंत्रणा लावून, प्रत्येकाला जर जेलमध्ये घालणार असाल तर ते महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, असं खासदार हेमंत पाटील म्हणाले.

ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, त्याची मोठी चीड लोकांमध्ये निर्माण झाली आहे. याचे पडसाद लवकरच लोकांमध्ये उमटणार आहेत. महाराष्ट्र हा मराठ्यांचा, मावळ्यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रावर आत्तापर्यंत जे जे चाल करून आले, त्यांच्या कबरी इथं खोदल्या गेल्या. जे जे मुंबईला, महाराष्ट्राला बदनाम करू पाहतील आणि त्या पद्धतीचं कारस्थान करतील त्यांच्या कबरी उद्या महाराष्ट्रामध्येच खोदल्या जाणार आहेत, असा हल्लाबोल पाटील यांनी केला.

अंबरनाथ शहरातील पनवेलकर सभागृहात आज शिवसंपर्क अभियानांतर्गत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रावर आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढवला. यावेळी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!