कंदर: पाच हजार लोकसंख्या असणारे कंदर हे गाव उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वसलेले आहे येथील सरपंच मनीषा भास्कर भांगे या महिला सरपंचांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
देशावर आलेले संकट दूर करण्यासाठी आपला खारीचा वाटा म्हणून त्यांनी हे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आम्ही गावांमध्ये जंतुनाशक फवारणी करत असून गावातील गल्लोगल्ली,चौक, रस्ते, फवारणीचे काम जवळ जवळ संपत आले आहे त्याचप्रमाणे आपण स्वतः गावातील नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका असा सल्ला देत असून बाहेरील लोकांना गावांमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जर कोणी आजारी पडले तर प्राथमिक उपचार म्हणून येथील प्राथमिक केंद्रात त्याच्यावर उपचार करून पुढील तपासणीसाठी मोठ्या दवाखान्यात पाठवण्यात येत आहे.शक्यतो नागरिकांनी स्वतःचे संरक्षण स्वतः करावे त्यातच आपले व आपल्या कुटुंबाचे पर्यायाने देशाचे भले आहे असेही त्या म्हणाल्या. डॉक्टर व पोलीस यंत्रणेवर वरील तान कमी करण्यासाठी आम्ही आमच्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहोत असेही भांगे यांनी यावेळी सांगितले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
