जालना: जिल्ह्यातील भोकरदन येथे एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी ३० मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास भोकरदन शहरातील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवस्थानाजवळ ही घटना घडली आहे. प्रांजळ ज्ञानेश्वर कोल्हे (२४) असे मृत डॉक्टर महिलेचे नाव आहे.
साडीच्या पदराने डॉक्टर महिलेने घरातील फॅनला लटकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघड झाले. तसेच ही आत्महत्या नैराश्यातून करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मृत डॉ. प्रांजळ यांचा १५ जानेवारी २०२१ रोजी डॉ. ज्ञानेश्वर कोल्हे यांच्याशी विवाह झाला होता. डॉ. कोल्हे यांचे भोकरदन शहरात जनाई हॉस्पिटल आहे. घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
पोलिस आल्यानंतर त्यांचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. डॉ. प्रांजळ या भाजपचे शहराध्यक्ष सतीश रोकडे यांच्या भाची होत्या. डॉ. प्रांजळ यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजले नाहीये. प्रांजळवर नातेवाइकांच्या उपस्थितीत बरंजळा साबळे येथे अंत्यसंस्कार केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मात्र मोर्चे काढण्यात मग्न होते’
- ….आणि मालिका निर्मात्यांनी परराज्यातील मुक्काम वाढवला
- जालन्यात ओसरला कोरोनाचा कहर!
- राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्यसरकार कटीबध्द – अजित पवार
- मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल – सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
