मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू केले. या लॉकडाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली. काल ३० मे रोजी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे लॉकडाउन पुन्हा १५ दिवसांनी वाढवल्याची घोषणा केली.
लॉकडाउन काळाच महाराष्ट्र राज्यात चित्रीकरणासाठी परवानगी नसल्याने अनेक मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान मे महिन्याच्या आखेरीस लॉकडाउन संपत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्व मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागुन होते. मात्र मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर निर्मात्यांची घोर निराशा झाली आणि नाईलाजास्तव निर्मात्यानी परराज्यातील मुक्काम अजुन १५ दिवसांनी वाढवला.
एप्रिल महिन्यात लॉकडाउनची घोषणा होताच अनेक निर्मात्यांनी मुंबईतील चित्रीकरण थांबवल्याने दुसऱ्या राज्यात मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउन काळात सिल्वासा, दीव-दमण, गोवा, जोधपूर यासारख्या ठिकाणी अनेक मराठी मालिकांचं शुटींग सध्या सुरु आहे. मात्र याचा आर्थीक भुर्दंड निर्मात्यांला सहन करावा लागत आहे.यामुळे कोरोना नियमाच पालन करत महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी देण्यात यावी अशी मागणी घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेत निर्मात्यांनी सरकार दरबारी हा प्रश्न मांडला होता. मात्र अखेर निर्मात्यांच्या पदरी घोर निराशा पडली.
महत्वाच्या बातम्या
- जडेजाच्या खेळीवर सातत्याने होत होत्या टीका ; धोनीने केली ‘अशी’ मदत
- अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे- अजित पवार
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

