Share

लहान मुलाच्या भांडणावरून महिलेला मारहाण

Published On: 

औरंगाबाद : लहान मुलाच्या भांडणावरून समजविण्यासाठी गेलेल्या तक्रारदार महिलेला आसेफ शेख, आदील शेख , अरशद शेख आणि महिला यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सिडको एमआयडीसी परिसरात घडली.

सिडको एमआयडीसी घरासमोर तक्रारदार महिलेची आणि परिसरातील मुले खेळत होती. खेळता खेळता त्यांच्यात भांडण झाले. त्याची तक्रार त्यांनी त्यांच्या पालकांना दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी शेख आसेफ यांचे नातेवाईक आले, त्यांच्यात वाद झाले.

त्यांनी तक्रारदार महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर ते सगळे तिथून निघून गेले. तक्रारदार महिलेने पोलीस ठाणे गाठत त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणा-या चार जणांविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!