Share

‘कारवाईची नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाला टाळे ठोकू’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस बजावून संपात फूट पडण्याचा प्रयत्न सुरू आहे. एसटी महामंडळाने कारवाईची नोटीस तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपने दिला आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही.

आज आम्ही राज्यभरात एसटी महामंडळाच्या आगारात टाळे ठोकण्याचे आंदोलन करणार होतो, पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले म्हणून हे आंदोलन केले नाही. मात्र, जर सरकार जागे झाले नाही तर आम्ही ते आंदोलन करणार आहोत. शासनाने दोन दिवसांत अभ्यास करून तत्काळ निर्णय घ्यावा. यासोबतच कारवाईची तत्काळ नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. 2 हजारपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची नोटीस बजावली आहे. याशिवाय एसटी कर्मचारी कामावर हजर होत असल्याच्या प्रसारमाध्यमांवर खोट्या बातम्या पसरवून एसटीच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. मात्र, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, पहिल्या दिवसापासून ज्या भावना आहेत, त्या आजही कायम आहेत. हे आंदोलन कोणत्या पक्षाचे नसून गोरगरीब मराठी कर्मचाऱ्यांचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आझाद मैदानवरील आंदोलन सुरूच राहणार आहे, असेही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!