Share

नवाब मलिकांनी आपला वकूब ओळखून वक्तव्ये करावीत-आ.अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेत यासाठी दिल्ली मुख्यालयातील अधिकाऱ्यांचे विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे एसआयटीचे पथक आता मुंबईत दाखल झाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी टीका केली असून त्यांना भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत नवाब मलिकांवर निशाना साधला आहे, भातखळकर म्हणाले, एनसीबी एसआयटीने तीन प्रकरणांचा तपास सोडला असून आर्यनसह तीनच प्रकरणांचा एसआयटी तपास करणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एसआयटीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे म्हणे. आक्षेप घ्यायला नवाब मलिक कोण लागून गेले आहेत? त्यांनी आपला वकूब ओळखून वक्तव्ये करावीत. असे भातखळकर म्हणाले.

मुंबईतील क्रूझ ट्रग्ज प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक यांच्यावर आरोपांचे सत्रच सुरु केले आहे. याबाबत मलिकांनी ट्विटरवर के.पी. गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील संभाषणाचं व्हॉट्सअप चॅट शेअर करत आरोप करत काशिफ खानला प्रश्न का विचेरले जात नाहीत. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय? असा प्रश्नही मलिकांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!