मुंबई : सर्वांना खळखळून हसायला लावणं ही एक अवघड कला आहे. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अस्सल विनोदी कलाकार होऊन गेले. ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सर्वांचे मनोरंजन केले. यातील एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते दादा कोंडके होय.त्यांच्या विनोदी शैलीने सगळ्यांना हसण्यास भाग पाडले आहे. या महान अभिनेत्याच्या स्मरणार्थ मराठीमध्ये लवकरच एक नवीन चित्रपट येणार आहे. जो विनोदवीरांची गाथा सांगणार आहे.
‘चला हवा..’ फेम अभिनेता भालचंद्र कदम अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडक्या भाऊ कदमने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्याने त्यांच्या नवीन’पांडू’ या चित्रपटाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुरुवातीला दिवंगत अभिनेते दादा कोंडके दिसत आहेत. तसेच नंतर भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची जोडी दिसत आहे. त्या दोघांनीही हवालदाराच्या ड्रेस घातला आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘दादा परत या ना’ हे गाणे लागले. व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, ‘डोक्यावर घालून टोपी आणि हातात घेऊन दांडू. ३ डिसेंबरला थेटरात विनोदाचा धमाका करायला येतोय झी स्टुडिओजचा नवा सिनेमा पांडू. त्यांच्या या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विजू माने हे आहेत.
नुकताच चित्रपटाचा प्रोमो पाहून तर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच चित्रपटात नक्की काय असणार आहे. चित्रपटगृहात हा सिनेमा पाहायला मिळणार असून चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते यांनी गायली आहेत.या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगत असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ही पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅचदरम्यान फॅन्समध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

