Share

राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने शिवसेना-भाजपच्या युतीची शक्यता अधिक धूसर ? फडणवीस म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलाय. इतकंच नाही तर राणेंचा मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. मराठा समाजातील चेहरा, तसेच शिवसेना-भाजपची युती तुटल्यामुळे मुंबईसह कोकणातील येत्या स्थानिक निवडणूका बघता राणेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय.

शिवसेना-भाजपची युती असताना राणेंचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचं बोललं जातं. आता शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर राणे हे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेबाबत सातत्याने आक्रमक टीका करत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे एकप्रकारे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने नारायण राणे यांच्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे का ? अशी चर्चा सुरु आहे.

यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्यासाठी फडणवीसांचा देखील मोठा हात आहे. यामुळेच शपथ घेतल्या घेतल्या राणेंनी त्यांचे देखील आभार मानले होते. दरम्यान, फडणवीस आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते.

तेव्हा पत्रकरांनी त्यांना, पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपची युती पाहायला मिळू शकते अशा चर्चा सुरु असतानाच नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यामुळे युतीची शक्यता आता मावळली का? असा प्रश्न विचारला. यावर फडणवीस म्हणाले, ‘अशा चर्चा होत राहतात. अशा चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात. नारायण राणेंना त्यांचा क्षमतेचा विचार करुन केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार केला गेलेला नाही,’ असं उत्तर फडणवीसांनी दिलं आहे.

नारायण राणे यांचा प्रवास आणि शिवसेना –

शिवसेना आणि राणे घराण्याचे गेल्या काही वर्षांमधील असलेलं वैर हे उभ्या महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलं आहे. शिवसेनेपासूनच सुरुवात झालेल्या नारायण राणे यांची नंतरच्या काळात शिवसेनेशीच कटुता झाली. १९८५ साली मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले होते. यानंतर आमदार, मंत्री आणि मग १९९९ साली शिवसेना-भाजपचं युती सरकार असताना ते शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले होते. तरनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा ते राज्यात मंत्री होते. काँग्रेसननंतर स्वतःचा पक्ष आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास कायमच चर्चेत राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!