Share

Bacchu Kadu: “निधीवाटपाबाबत नाराजीतून एकनाथ शिंदेंसोबत” ; बच्चू कडू यांच स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आमचा शिवसेनेला समर्पित पक्ष होता. प्रहार संघटनेने शिवसेनेच्या माध्यमातून आघाडीला पाठिंबा दिला होता असं बच्चू कडू म्हणालेत.

शिवसेनेचे ७५ टक्के आमदार या बाजूला आल्यामुळे हा निर्णय घेतला गेला बच्चू कडू (bacchu kadu) यांनी यावेळी स्पष्ट केल. वेगळी अशी व्यक्तिगत नाराजी नाहीये. नाराजी फक्त निधीच्या वाटपाबाबत आहे. निधी कमी जास्त दिला जोता. निधी वाटपात विषमता होती. असे आरोप त्यांनी शिवसेनेवर केले आहेत. पण शिवसेनेच्या आमदारांकडे लक्ष दिलं जायला हवं होतं ते दिलं गेलं नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

एवढंच नाही तर स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या हालचालीही सुरु असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. महाराष्ट्रातील भाजपा नेते संजय कुटे आमच्यासोबत गुवाहाटीमध्ये असून सूरत आणि गुवाहाटीमधील भाजपा नेते आमच्या संपर्कात असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

पक्षश्रेष्ठींकडून शिवसेनेच्या आमदरांकडे लक्ष देण्याची गरज होती. परंतु पक्षाकडून आमदारांकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे प्रचंड नाराजी असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!