🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाकडे सोपवले असल्याची माहिती एका अधिकार्याने दिली आहे.
विंग कमांडर अभिनंदन आज दुपारी तीन वाजता भारताच्या वाघा-आतारी सीमेवर दुपारी ३:०० वाजता भारताचे दूतावास घेऊन पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे.
पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वायू दलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज मायदेशात परतणार आहेत. भारत पाकिस्तान दरम्यान असणाऱ्या वाघा बॉर्डरद्वारे अभिनंदन यांना भारतात आणलं जाणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल पाकच्या संसदेत वर्धमान यांना सोडल जाणार असल्याची घोषणा केली होती.
त्यानंतर आज पाकिस्ताने कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाकडे सोपवले असल्याची माहिती मिळत आहे.
भारताने बालाकोट येथे केलेल्या एअर स्टाईकला प्रत्युत्तर देण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. सतर्क असणाऱ्या भारतीय वायुदलाने पाकच्या विमानांना पिटाळून लावले होते. यावेळी मिग-२१ चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली होती. यावेळी स्थानिक पाकच्या लष्कराने त्यांना ताब्यात घेत होते.
याबबत अधिकृतवृत्त द प्रिंटने दिले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
